थेंब एक हा पूरा |
मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्या गरजु मानवाला चालते.
मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. ही बाब लक्षात घेउन सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट व अनिरुद्ध समर्पण पथक, ए.ए.डी,एम. यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.
अपघातात अतिरिक्त रक्तस्त्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसुती पश्चात रक्तस्त्राव आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्या मानवाचे प्राण वाचवु शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसर्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्ताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. ह्याच्यासाठी आता ऎच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला समजायला हवी.
रक्तदान केल्यानंतर २० ते ३० मिनीटे विश्रांती नंतर ती व्यक्ती पुर्ववत काम करु शकते. रक्तदान करण्यासाठी साधारणतः १८पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी वय लागते. वजन ५० कि,ग्रॅ पेक्षा जास्त हवे. हिमोग्लोबिन १२.५% पेक्षा जास्त असावेत.
काविळ, मलेरिया, टायफ़ाइड, डेंग्यु, चिकनगुनिया, एका वर्षामधे कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, अनेमिया असल्यास, गुप्तरोग, क्षयरोग, कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे काही असाध्य आजार किंवा वयोपरत्वे आजार असल्यास रक्तदान करु नये.
No comments:
Post a Comment