Monday 6 April 2015

रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व

रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व

आता आपण रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ. बापू कोणताही उपक्रम राबवतात त्यामागे आपल्या श्रद्धावान मित्रांच्या उन्नतीसाठी निश्चित असा एक हेतु असतो. रक्तदान केल्याने यज्ञॆन दानेन तपसा या तिनही गोष्टी अनिरुद्ध बापू आपल्याकडून करवून घेतात.



यज्ञ:- यज्ञ म्हणजे काय? तर समर्पणाच्या भावनेने परमेश्वरास स्मरुन केलेले पवित्र कार्य.

आपण ज्यावेळी रक्तदान करायला जातो त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या मनात हिच भावना असते म्हणजेच हा एक प्रकारचा यज्ञच बापू आपल्याकडून करवुन घेतात.

नामाचा यज्ञ म्हणजे खरा यज्ञ. बापुंचे नामस्मरण आपण त्यांच्यावरील प्रेमापोटी घेत असतो. ज्यावेळी आपलं रक्त काढलं जात असतं त्यावेळी आपण मनात सतत बापूंच नामस्मरण करत असतो. शिवाय गजर करणारी मंडळी असतातच. तर मग अशा या पवित्र वातावरणात बापू सहजरित्या रक्तदानाच औचित्य साधून हा यज्ञ आपल्याकडून करुन घेत असतो.

दानेन:- म्हणजेच दान करणे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता ज्यावेळी एखादी गोष्ट आपण दुसर्‍यांना देतो का? कारण ते माझ्या सद्गुरुला आवडते म्हणून तर त्या त्यागाला आपण दान असे म्हणतो आणि असे सत्पात्री दान रक्तदानातून बापू आपल्याकडून करवुन घेतो.
माझ्या परमेश्वराला, सद्गुरुला आवडणार्‍या नऊ थेंबांपैकी आवडणार्‍या रक्ताचे थेंब मी त्याच्या प्रेमापोटी माझ्या गरजू आप्ताला देत आहे. (अवघाची संसार सुखाचा करीन..)
कितीही पैसे मोजले तरी एखादी गोष्ट पर्यायाने मिळू शकेल. पण वेळ्प्रसंगी रक्तच रक्ताच्या कामी येतं. त्यामुळे रक्तदानाला मोल नाही. हे अमुल्य दान आहे म्हणुनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलेलं आहे.

तपसा:- म्हणजेच तप करणे. कलियुगात तप करणे म्हणजे कोणत्याही जंगलात जाऊन किंवा गुहेत बसुन आसन लावणे नव्हे तर तप म्हणजे दिनदुबळ्यांची सेवा करणे. आणि हीच सेवा बापू रक्तदानातून आपल्याकडून करवून घेतात. या मागेही बापुंचा हेतु हाच असतो की माझ्या बाळांची प्रगती होवून या समाजाची उन्नती व्हावी, कारण तप केल्याने आम्हाला काय मिळते?
१) तपश्चर्येचा जेवढा साठा वाढत जातो, तितके पवित्र व निर्मळ स्थान मनुष्याला प्राप्त होते.
२) तपश्चर्येने चिंतन शक्तिमान व रसमय होते.
३) तपश्चर्येने असाध्य ते साध्य होत असते.


आणि आपल्या आपल्या आयुष्यातल्या ज्या अनंत अडचणी आहेत ज्या आपणांस असाध्य वाटतात त्या साध्य करण्यासाठी रक्तदानासारख्या तपाची आवश्यकता आहे.

आज आपल्या प्रत्येकाला वाटते की मला जो आनंद बापूंमुळे मिळत आहे तोच आनंद इतरांनाही मिळॊ. मग यासाठी रक्तदान ही चालून आलेली संधी आहे. आपण आपल्या शेजारी, नातलग, मित्रमंडळी यांना आपल्या संस्थेच्या रक्तदान शिबिरासंबंधी सांगु शकतो. 


प्रयत्न करणे माझे काम।।  यशदाता तो मंगलधाम।। 
अंति तोचि देईल विश्राम।।   चिंतेचा उपशम होईल।।


1 comment: