Monday 6 April 2015

Blood Donation Wallpaper - 1

Blood Donation Camp 2015
धमन्यांमध्ये रक्त वाहतेय ही तर अनिरुद्ध कृपा
दान करुनी व्यक्त करुया आपण अंबज्ञता
महारक्तदान शिबिर २०१५ 
१२ एप्रिल २०१५ 
९ ते ६

रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व

रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व

आता आपण रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ. बापू कोणताही उपक्रम राबवतात त्यामागे आपल्या श्रद्धावान मित्रांच्या उन्नतीसाठी निश्चित असा एक हेतु असतो. रक्तदान केल्याने यज्ञॆन दानेन तपसा या तिनही गोष्टी अनिरुद्ध बापू आपल्याकडून करवून घेतात.

रक्तदानाचे महत्त्व

blood drop
थेंब एक हा पूरा
मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.